VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,२३ जानेवारी २०२६::- दिनांक१९/०१/२०२६ ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या संदर्भात निवेदन, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या शिष्टमंडळाने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे साहेब, मा.शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री बाबासाहेब पवार साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या विवीध प्रलंबित समस्या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांचे नेतृत्वात मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री वैभव बारेकर साहेब,मा.सहायक प्रशासन अधिकारी श्री धनंजय दुमपेटीवार साहेब,श्री वैद्य साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन,निवेदन देऊन चर्चा केली.

प्रलंबित समस्या पुढील प्रमाणे :-
१)जुलै २०२४ पासुन फेब्रुवारी २०२५ पर्यंत ८ महिन्याची १% घरभाडे भत्ता फरकाची थकबाकी रक्कम त्वरित अदा करण्यात यावी.
२) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत २४ वर्षे सेवा पुर्ण केलेल्या पात्र शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ तात्काळ देण्यात यावा.
३) आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे आलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी.
४) जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा शासन निर्णय (शालेय शिक्षण) दिनांक:-१३/०८/२०२५ नुसार दर महिन्याच्या १ तारखेलाच करण्यात यावे.
५) जिल्हा अंतर्गत बदलीने शाळा बदल झालेल्या शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब ( Add.HRA) शालार्थ प्रणालीत पुर्ववत सुरू करण्यात यावी.
६) नोव्हेंबर २००५ पुर्वी जाहिराती प्रमाणे भरती व नियुक्ती झालेल्या आणि शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केलेल्या २३७ शिक्षकांची NPS खात्यातील रक्कम GPF खात्यात त्वरित वर्ग करण्यात यावी.
७) कोर्टाच्या निर्देशानानुसार १ जानेवारी २००६ ते ३१ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीतील उर्वरित शिक्षकांची १५% प्रोत्साहन भत्ता थकबाकीची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी.
८) सेवा पुस्तिका अद्यावत करण्यासाठी तालुका स्तरावर कॅम्प लावण्यात संदर्भात मा.गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात यावे.
९) शासन निर्णय २ जून २०२५ नुसार प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनातील त्रृटी दुर करुन वेतन निश्चिती करण्यात यावी.
१०) पुढील शैक्षणिक सत्रापासून केंद्र स्तरीय व तालुका स्तरीय क्रिडा संमेलनासाठी निधीत वाढ करण्यात यावी.
११) प्राथमिक शिक्षकांची थकीत वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व थकीत बिले त्वरीत अदा करण्यात यावे. १२) सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ सेवानिवृत्तीच्या महिन्यातच मिळण्यात यावे.
१३) १२ वर्ष सेवा पुर्ण झालेल्या उर्वरित शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी त्वरीत लागु करण्यात यावी. याप्रसंगी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान मान. शिक्षणाधिकारी साहेबांनी निवेदनातील सर्व प्रलंबित समस्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,जिल्हा सरचिटणीस श्री अशोक राॅयसिडाम,जिल्हा कोषाध्यक्ष श्री राजेश चिलमवार,जिल्हा सहसरचिटणीस श्री लोमेश उंदिरवाडे, शिक्षक संघाचे जिल्हा सल्लागार श्री ओमप्रकाश झाडे,गडचिरोली तालुकाध्यक्ष श्री धनेश कुकडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष श्री मारोती वनकर, चामोर्शी तालुका मुख्य सल्लागार श्री सिद्धार्थ सोरते* इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
