VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मुक्तीपथ व्यसनमुक्ती रॅलीच्या माध्यमातून शहरात जनजागृती,
गडचिरोली /चामोर्शी,१२ फेब्रुवारी २०२६::- चामोर्शी तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी “नशा सोडा, जीवन वाचवा”, “तंबाखू आणि दारूला नकार द्या” अशा घोषणांसह शाळेतून चामोर्शी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वाडवंटी चौक मार्गे पोलीस ठाण्यापर्यंत रॅली काढली. त्यांच्या हातात जनजागृतीपर संदेश लिहिलेले पोस्टर आणि बॅनर होते.
या रॅलीचा मुख्य उद्देश युवकांमध्ये वाढत चाललेल्या व्यसन प्रवृत्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ दिली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, मांडवगडे सर, मडावी सर, उराडे मॅडम, शाळा समितीच्या अध्यक्षा भाग्यश्री सोनटक्के, हिना भगत, शिक्षकवृंद तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. मुक्तीपथ तालुका संयोजक आनंद इंगळे, समीक्षा डांगे, पत्रकार हस्ते भगत आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
