Friday, May 22, 2026
HomeBhamragadभामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नाल्यावर पुलासाठी ग्रामस्थांची आर्त हाक...

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नाल्यावर पुलासाठी ग्रामस्थांची आर्त हाक…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

‘राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खूणे यांची पाहणी तथा नागरिकांसोबत भेट आणि या भागात नागरिकांसोबत थेट संवाद, तात्काळ मंजुरीची मागणी,

गडचिरोली /भामरागड,१५ फेब्रुवारी २०२६::- भामरागड तालुका येथील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त पट्ट्यातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोंडराज, इरपणार, प्ररायणार आणि पेनगुंडा या गावांसह परिसरातील नागरिकांनी मुख्य नाल्यावर तातडीने पुलाची उभारणी करण्याची जोरदार मागणी केली आहे.राष्ट्रीय मानवाधिकार संघटना चे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खूणे यांनी नुकताच या भागाचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला . ग्रामस्थांशी संवाद साधताना नागरिकांनी पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यामुळे होणाऱ्या गंभीर हालअपेष्टांची माहिती दिली.१० ते १२ गावांचा संपर्क दरवर्षी पूर्णपणे तुटतो .तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी मधोमध असलेला मोठा नाला ओलांडणे अनिवार्य आहे.

मात्र पावसाळ्यात हा नाला धोकादायक पातळीवर वाहत असल्याने सुमारे १० ते १२ गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो“पूल नसल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला अक्षरशः बेटावर राहिल्या सारखे राहावे लागते,” अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलासाठीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला. नाल्यावर तातडीने पुलाला मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लवकरात लवकर प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भामरागड तालुक्या तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. डॉ. खूणे यांनी नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले व या सर्व विषयाबाबत राज्याचे महामहीम राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना भामरागड तालुक्यातील शंभर लोकांच्या शिष्टमंडळासहित भेट घेण्याचे आश्वासन दिले! डॉ प्रणय भाऊ खुणे यांच्या भेटीमुळे अतिदुर्गम व संवेदनशील भागात पायाभूत सुविधा उभारण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून, व पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. प्रशासन यावर कितपत तत्परतेने निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी संघटन नेते प्रवीण गेडाम. मास्टर महेश बनसोड व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular