Saturday, September 12, 2026
HomeChamorshi"हर हर महादेवच्या जयघोषात दुमदुमले गडचिरोली" विदर्भाची काशी मार्कंडेश्वर येथे दर्शना करिता...

“हर हर महादेवच्या जयघोषात दुमदुमले गडचिरोली” विदर्भाची काशी मार्कंडेश्वर येथे दर्शना करिता भाविकांची अलोट गर्दी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी तालुक्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण,

गडचिरोली/मार्कंडादेव, १५ फेब्रुवारी २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या उत्तरवाहिनी काठावर हे प्राचीन मंदिर वसलेलले ऐतिहासिक मार्कंडादेव (मार्कंडेश्वर) मंदिर आहे. या उत्तरवाहिनी वैनगंगा नदीत अंघोळ करून मार्कंडेश्वराची पूजा अर्चा करण्याची परंपरा खूप वर्षापासून भाविक पाडत आहेत.आणि मार्कंडेश्वर दर्शनाला आलेल्या भाविकांनी येथे हळकुंड खरेदी करणे ही परंपरा सुद्धा आहे.

 महाशिवरात्रीनिमित्त मोठी जत्रा असते ज्याला ‘विदर्भाची काशी’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. 

येथे ८ व्या-१२ व्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील मंदिरांत महाशिवरात्रीला लाखो भाविक गर्दी असते,भक्ती भावने पूजा अर्चा करून महाप्रसाद घेतात. 

स्थान व महत्त् आणि शिव भाविकांची गर्दीः- 

यात्रेच्या काळात दररोज एक लाख तर महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी दोन ते तीन लाखांहून अधिक भाविक विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून दर्शनासाठी येतात.

 या वर्षी महाशिवरात्रीला मार्कंडेश्वर यांची महापूजा व अभिषेक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

दर्शनाला आलेल्या शिवभक्तांकरिता उपवासांचा फराळ, महाप्रसाद, पाण्याची व्यवस्था मार्कंडा देव मार्कंडेश्वर ट्रस्ट आणि गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जपलेले समाजसेवक यांच्याकडून सुद्धा शिवभक्तांना उपवासाचा फराळ, केळी, पाणी बॉटल ची व्यवस्था केली जाते.

जत्रेचे आकर्षणः मार्कंडेश्वर मंदिराच्या परिसरात मोठी जत्रा भरते, इथे मनमोहन करणारी दुकाने, शिवभक्तांच्या मनोरंजनाकरिता आकाशी पाळणे, सर्कस, आणि ‘मौत का कुआँ आणि ‘ यांसारख्या मनोरंजनाच्या साधनांची बरीच साधने असतात.

सुरक्षा व व्यवस्थाः भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यात्रेच्या काळात सज्ज राहून चोख नियोजन करीत असून  चोक बंदोबस्त आहे.

मार्कंडादेव हे विदर्भातील एक प्रमुख धार्मिक केंद्र असून येथील महाशिवरात्री यात्रा एक मोठे सांस्कृतिक व धार्मिक संमेलन असते. या देवळांपैकी मार्कंडेय ऋषींचे देऊळ, यमधर्म आणि महादेवाचे देऊळ हे उत्कृष्ट शिल्पकृतीचे नमुने आहेत. 

या प्रकारात मार्कंडेय ऋषी, नंदिकेश्वर, यमधर्म, भृशुंडीमुनी, मृत्युंजय, विठ्ठल रखुमाई, उमाशंकर, दशावतार, शक्तिदेवी, हनुमान, गणेश, शंकर, विश्वेश्वर, भीमेश्वर, वीरेश्वर इ. मंदिरे आहेत. या मंदिराकडे बघतांना आपण खजुराहोची मंदिरे बघत असल्याचा भास होतो. म्हणूनच मार्कंडेश्वर यात्रेला दरवर्षी शिवभक्त लाखोच्या संख्येत दर्शनाला येतात.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular