Sunday, September 13, 2026
HomeEtapalliएटापल्ली तालुक्यात धान उचल न झाल्याने हजारो क्विंटल धनाची नासाडी...

एटापल्ली तालुक्यात धान उचल न झाल्याने हजारो क्विंटल धनाची नासाडी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गोडाऊन नसल्याचा धान खरेदीला फटका,

गडचिरोली /एटापल्ली, २७ फेब्रुवारी २०२६::- एटापल्ली तालुक्यातील तोडसा येथे सन २०२४ – २०२५ या कालावधीत धान खरेदी १९६७८ क्विंटल धनाची खरेदी करण्यात आली होती.मात्र त्या पैकी ७९६७ क्विंटल धानाची उचल झाली. परंतु राईस मिलर यांनी धान्याची उचल न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हजारो क्विंटल धान हे उघड्यावर पडून खराब झाले आहे. हीच परिस्थिती सुद्धा आदिवासी विकास महामंडळ कसनसुर येथे सुद्धा बघायला मिळत आहे. कारण आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर अनेक ठिकाणी गोडाऊन नसल्यामुळे हे धान खराब झालंय आणि आता ही तूट कुठून भरून काढावी असा प्रश्न केंद्र अध्यक्षासह सचिवाला पडला आहे.

शासनाने क्विंटल मागे १ किलो तुट ही शासनाद्वारे दिली जाते. परंतु आता हजारो क्विंटल धनाची उचल न केल्यामुळे या केंद्राला लाखो रुपयांच्या फटका बसला आहे. तर हे खराब झालेल्या धनाची भरपाई कुठून करणार असा प्रश्न आता सतावत आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून केंद्र संचालकाचे कमिशन सुद्धा मिळालं नसल्यामुळे शासनास केंद्र संचालकांची विनंती आहे.की लवकरात लवकर कमिशन द्यावे जेणेकरून तुटीच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा आता केंद्र अध्यक्ष करीत आहे.

  संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसान टाळावे, अशी अपेक्ष व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular