VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करावी* – काँग्रेसची मागणी,
गडचिरोली,१२ मार्च २०२६::- केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ₹६० तर व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ₹१५० इतकी दरवाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा मोठा बोजा टाकला आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिक, गृहिणी, कष्टकरी तसेच लघु व्यावसायिकांचे आर्थिक गणित या दरवाढीमुळे पूर्णपणे कोलमडले आहे.
घरगुती वापरातील गॅस हा प्रत्येक कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक असून त्याच्या दरवाढीचा थेट परिणाम जनतेच्या घरखर्चावर होत आहे. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय, लघुउद्योजक तसेच छोट्या व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा तात्काळ पुनर्विचार करून ती कमी करण्यात यावी, या मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अनुसचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी जि. प. सदस्य सौ. कविता भगत, निकेश गद्देवार, विजय लाड, प्रतीक बारसिंगे, उत्तम ठाकरे, श्रीनिवास ताडपलीवार, हरबाजी मोरे, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, नदीम नाथानी,स्वप्निल बेहेरे, प्रेमानंद गोंगले, राहुल वैरागडे, कुलदीप इंदूरकर, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकार, जावेद खान, नेहाल आभारे,सौ. कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. रिता गोवर्धन, सौ. मंजू आत्राम, सौ. मीनल चिमूरकर, शेवन्ता हलामी सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
