VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
महाराष्ट्र /मुंबई,१२ मार्च २०२६::- मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय शहीद विर बाबुराव पुल्लेसूर शेडमेक यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच भाजपा कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण, आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते राष्ट्रीय शहीद विर बाबुराव शेडमेक यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी वीर बाबुराव शेडमेक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांना अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले की, वीर बाबुराव शेडमेक यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीमुळे आदिवासी समाजासह संपूर्ण देशाला प्रेरणा मिळत आहे.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कार्यालय प्रमुख रवीजी अनासपुरे, देवरीचे आमदार संजय पुराम, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री संभाजी निलंगेकर, आकाश मडावी शहर अध्यक्ष आदिवासी मोर्चा नागपूर, रोहित कुंभरे, सागर इवनाते, राकेश गरपल्लीवार, राजेंद्र सांगळै संगमनेर, रामचंद्र जाजु संगमनेर , सचिन खुळे संगमनेर, कल्पेश पोगुल संगमनेर, मुकुंद उपरे संगमनेर, दिपेश ताटकर संगमनेर, योगेश सुर्यवंशी भिल्ल समाज नेते, प्रविण घोडीया, निलम पठडे, ज्योती खाडीया, जगदीश घाडीया, कणु खारवी यांच्या सोबतच नाशिक, अहिल्यानगर व मुंबई उपनगर मधील आदिवासी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
