Friday, May 22, 2026
HomeGadchiroliडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,१४ एफ्रिल २०२६::- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आज गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हा परिषद परिसरातील कॉम्प्लेक्स येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी श्री. नितीन गावंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत समाजातील सर्व घटकांनी समानतेच्या तत्त्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

डॉ. आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांना दिलेले अधिष्ठान आजही मार्गदर्शक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेशही देण्यात आला.

यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular