VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,१४ एफ्रिल २०२६::- गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असता,या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत सामाजिक न्याय, समता, बंधुता व लोकशाही या मूलभूत मूल्यांवर आधारित बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले.यावेळी त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा गौरव करण्यात येऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना प्राप्त झालेल्या अधिकारांची जाणीव करून देण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, पोलीस निरीक्षक गडचिरोली विनोद चव्हाण साहेब,भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजीत कोवासे, आदिवासी काँग्रेस राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम,नगरसेवक सतीश विधाते,नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,जिल्हा उपाध्यक्ष शंकररावं सालोटकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर वासेकर,समशेरखा पठाण, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, काशिनाथ भडके, नेताजी गावतुरे, उत्तम ठाकरे, मोहन वर्गंटीवार, अब्दुल पंजवानी, माधव गावड, हेमंत मोहितकर, जितेंद्र मुनघाटे, शुभम गजबे, सुदर्शन उंदीरवाडे, लालाजी सातपुते, पांडुरंग घोटेकर, निकेश कमीडवार, स्वप्निल बेहेरे, प्रचित चौधरी, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, जावेद खान, सौं. कल्पनाताई नंदेश्वर, सौं. कविताताई उराडे, सौं. मिनलताई चिमूरकर, सौं. रीताताई गोवर्धन, सौं. शालिनीताई पेंदाम सह उपस्थित होते.
