Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliजिल्ह्यात अवैध धंद्यावर मोहिमाच्या माध्यमातून धडक कारवाई...

जिल्ह्यात अवैध धंद्यावर मोहिमाच्या माध्यमातून धडक कारवाई…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

5,00,700 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त,

ऑपरेशन ऑल आऊट व कॉम्बिंग ऑपरेशनची यशस्वी मोहीम,

गडचिरोली, चामोर्शी व आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम,

गडचिरोली,२६ जून २०२६::- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच दारू, गुटखा असा अवैध व्यवसायांना आळा घालण्यासा मिली गडचिरोली पोलीम दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 24 जून 2026 रोजी गडचिरोली उपविभागात विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीम राबविण्यात आली.

या मोहीमेत गडचिरोली, चामोर्शी व आरमोरी  पोलीस स्टेशन हद्धीत अवैध दारू व इतर अवैध धध्यांवर कारवाई करण्यात आली.

अवैध दारू विरोधात 13 कारवाया करून एकूण 5,00,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कंबिंग ऑपरेशन अंतर्गत 139 सराईत व अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हॉटेल्स, लॉजेस, निर्जन स्थळी कसून तपासणी करून नोंदवही, ओळखपत्रे व वास्तव्य करणाच्या व्यकींची माहिती पडताळण्यात आली.

वाहनावर नाकाबंदी मोहीमेत 300 वाहनांची तपासणी करण्यात आली असून 40 वाहनांवर मोटार वाहन कायद्यन्सार कारवाई करण्यात आली.

आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

“गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ठ.”

या मोहिमेत नेतृत्व व मार्गदर्शन :- 

गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा,  अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी,  सहा. पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरहे,

पोलीस निरीक्षक व पथक प्रमुख :-

पो. नि. विनोद चव्हाण (गडचिरोली), पो.नि. दीपक डॉय (चामोर्शी) ,पो.नि. कैलास गावते (आरमोरी),

( तसेच सर्व अधिकारी व अमलदारांचे विशेष सहकार्य  )

कॉबिंग ऑपरेशनची धडक कारवाई कायद्याचा धाक, सुरक्षित गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर आणि कटिबद्ध !

भविष्यातही अशा विशेष मोहीम सातत्याने राबवून अवैध व्यवसायाला पूर्णपणे नष्ट करण्याचे प्रयत्न आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular