Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiसहाय्यक आयुक्त नीरज लोहकरे यांना सेवानिवृत्तीपर निरोप...

सहाय्यक आयुक्त नीरज लोहकरे यांना सेवानिवृत्तीपर निरोप…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

जिल्हा केमिस्ट्र अँड ड्रगिस्ट असोसिएशन कडून कार्याचा गौरव,

गडचिरोली/चामोर्शी,०४ जुलै २०२६::- अन्न व औषध प्रशासन, गडचिरोलीचे सहाय्यक आयुक्त नीरज लोहकरे यांच्या निवृत्तीनिमित्त गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने हॉटेल लँडमार्क येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नीरज लोहकरे यांच्या कार्यकाळातील प्रामाणिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाजाचा गौरव केला. जिल्ह्यात औषध व्यवसायातील शिस्त, नियमांचे प्रभावी पालन आणि प्रशासनाशी समन्वय राखण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

समारंभात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नीरज लोहकरे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. उपस्थितांनी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, औषध विक्रेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे वातावरण भावनिक असून उपस्थितांनी नीरज लोहकरे यांच्या सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांना निरोप दिला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular