VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कायदा व सुव्यवस्थेसाठी शुभेच्छांचा वर्षाव,
गडचिरोली /अहेरी,०६ जुलै २०२६::- अहेरी येथे नुकतेच रुजू झालेले नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) श्री. हेमंत चांदेवार साहेब यांचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहेरी उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने राखण्याची जबाबदारी त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासन आणि जनतेमधील समन्वय अधिक दृढ होईल, अशी अपेक्षाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
स्वागत प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, जिल्हा सचिव अभिजित शेंडे, जिल्हा सचिव सागर डेकाटे, भाजपा सोशल मीडिया संयोजक (अहेरी विधानसभा क्षेत्र) राकेश कोसरे, सागर बिट्टीवार, अजय ठाकरे, मल्लेश तोटावार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुष्पगुच्छ देऊन श्री. हेमंत चांदेवार साहेबांचा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत अहेरी उपविभागात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त केला.
