VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
विविध विषयांवर सविस्तर चर्चा,
गडचिरोली /चामोर्शी,०६ जुलै २०२६::- येथील व्हाईस आॉफ मीडिया चामोर्शी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत संघटनेच्या विविध उपक्रमांबाबत, पत्रकारितेतील समन्वय तसेच आगामी कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी व्हाईस आॉफ मिडीयाचे चामोर्शी तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.बैठकीत पत्रकांच्या विविध समस्या, संघटनात्मक बळकटी, संघटनेचे पुढील वाटचाल आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत उपस्थित सदस्यांनी आपली मते व्यक्त केली.
या बैठकीला व्हाईस आॉफ मिडीयाचे अध्यक्ष पुंडलिक भांडेकर, सचिव विनोद खोबे, कोषाध्यक्ष अरुण गव्हारे,नितेश गट्टीवार, श्रावण वाकोडे,सुधीर गडपायले, प्रफुल्ल कोटांगले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी संघटनेच्या आगामी उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
