VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
शिक्षकांच्या हक्कासाठी 9 जुलैला गडचिरोलीत भव्य मोर्चा,
गडचिरोली ,०७ जुलै २०२६::- कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी, संच मान्यता धोरण तसेच बीएलओ आणि एस.आय.आर. कामाच्या सक्तीविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी आज *दि. 5/7/2026* रोजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, गडचिरोली येथे जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
मोर्चाचा तपशील :-
सभेत सर्वानुमते *9 जुलै 2026, गुरुवार* रोजी सकाळी *ठीक 11.00 वाजता* इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले.
कोणते प्रश्न आहेत :-
1. *कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता* रद्द करावी
2. *पदोन्नतीतील अन्यायकारक अटी* दूर कराव्यात
3. *संच मान्यता धोरण* मधील त्रुटी दुरुस्त कराव्यात
4. *बीएलओ, एस.आय.आर. सारख्या गैर-शैक्षणिक कामांच्या सक्तीला* विरोध
सभेला कोण उपस्थित होते :-

या नियोजन सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कास्टाईब शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्टाईब कल्याण महासंघ, आदर्श शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यासह इतर समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री रघुनाथ भांडेकर सर, श्री योगेश ढोरे सर, श्री चक्रपाणी कन्नाके सर, श्री पुंडलिक देशमुख सर, श्री बापु मुनघाटे सर, श्री प्रविण सहारे सर, श्री प्रदिप सेलोकर सर, श्री अशोक रायसिडाम सर, श्री खिरेंद्र बांबोळे सर, श्री ओमप्रकाश साखरे सर, श्री दिवाकर नारनवरे सर, श्री राजेश चिल्लमवार सर, श्री अशिम बिश्वास सर, श्री रमेश रामटेके सर, श्री आशिष धात्रक सर, श्री देवेंद्र लांजेवार सर, श्री गंगाधर मडावी सर, श्री साईनाथ अलोने सर, श्री जयंत राऊत सर, श्री संजय मडावी सर, श्री समीर भजे सर, श्री अमरदिप भुरले सर, श्री सचिन मेश्राम सर, श्री सुरेश चुधरी सर, श्री जितेन्द्र रायपुरे सर, श्री संजय येलेवार सर यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, गडचिरोली.
