VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,०९ जुलै २०२६::- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. रविंद्रजी (प्र.) वासेकर राहणार आहेत.
मेळाव्यात जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी पक्ष संघटना अधिक बळकट करणे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका तसेच विकासाच्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाला पक्षाचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
