Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiचामोर्शीत अतिरिक्त स्टॅम्प वेंडरची गरज...

चामोर्शीत अतिरिक्त स्टॅम्प वेंडरची गरज…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

सतीश भाऊ चिचघरे सामाजिक कार्यकर्ते यांची प्रशासनाकडे मागणी,

 गडचिरोली/चामोर्शी,०९ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यात सध्या केवळ एकच अधिकृत स्टॅम्प वेंडर कार्यरत असल्याने नागरिकांना विविध शासकीय व कायदेशीर कामांसाठी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, शासकीय व्यवहारांचे वाढते प्रमाण आणि दस्तऐवजांची वाढती गरज लक्षात घेता तालुक्यात तातडीने अतिरिक्त स्टॅम्प वेंडरची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश चिचघरे यांनी केली आहे.

मालमत्ता खरेदी-विक्री, प्रतिज्ञापत्र, करारनामा, शपथपत्र तसेच इतर विविध कायदेशीर कागदपत्रांसाठी स्टॅम्पची आवश्यकता असते. मात्र तालुक्यात एकच स्टॅम्प वेंडर उपलब्ध असल्याने नागरिकांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागते. गर्दीमुळे अनेकदा कामे खोळंबतात आणि वेळेत स्टॅम्प उपलब्ध न झाल्याने शासकीय कार्यालयांतील कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.

दुर्गम भागातील नागरिकांना तर वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च दोन्ही वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, वकील, दस्त नोंदणीशी संबंधित व्यक्ती तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता चामोर्शी तालुक्यात किमान आणखी एक किंवा दोन स्टॅम्प वेंडरची नियुक्ती करून सेवा अधिक सुलभ करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणेकरून नागरिकांची अडचण दूर होऊन शासकीय व कायदेशीर कामकाज अधिक वेगाने आणि सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा सतीश चिचघरे यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular