Monday, September 14, 2026
HomeChamorshiप्रमोद भगत यांना 'राज्य स्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार २०२६' प्रदान...

प्रमोद भगत यांना ‘राज्य स्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार २०२६’ प्रदान…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी, १२ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गोविंदा भगत यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत आज दि.१२जूलै रोजी ‘राज्य स्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार संकल्प बहुउद्देशीय संस्था, पारस (रजि. क्र. एफ-२१२२७ महा. ४२१/२०२२) आणि ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, तुळगा बु. (रजि. क्र. एफ-१९८६७ महा. २५९/२०१८) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात आला.

प्रमोद भगत यांनी सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने, समर्पित वृत्तीने आणि उल्लेखनीय कर्तव्यदक्षतेने कार्य करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातील प्रामाणिकपणा, सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहितासाठी जपलेली बांधिलकी याची दखल घेत संस्थेतर्फे त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेच्या वतीने त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या यशाबद्दल घारगाव परिसरासह चामोर्शी तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular