Tuesday, July 28, 2026
HomeGadchiroliदेवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचे उद्या आयोजन...

देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचे उद्या आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

महिला शेतकऱ्यांना बियाणे व गार्डनिंग साहित्याचे मोफत वितरण,

भाजपा महिला मोर्चा, गडचिरोलीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम

गडचिरोली ,२२ जुलै २०२६६::- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली “देवाभाऊ कृषी माऊली सोहळा” या विशेष उपक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), एमआयडीसी, कोटगल रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

महिलांमध्ये घरगुती बागकाम, टेरेस गार्डन आणि बाल्कनी गार्डनची संकल्पना रुजविण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिला भगिनींना बियाणे व गार्डनिंग साहित्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाला चालना देतानाच महिलांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करावी आणि सेंद्रिय शेती व घरगुती अन्नसुरक्षेचा संदेश समाजात पोहोचावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी तथा प्रदेश महामंत्री श्रीमती अल्काताई आत्राम तसेच जिजाऊमाता पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी महिला श्रीमती प्रतिभाताई चौधरी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहून महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेती, बागकाम, सेंद्रिय शेती आणि स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील महिला शेतकरी भगिनींना मिळणार आहे.

कार्यक्रमासाठी उपलब्ध असलेल्या कृषी वाण व गार्डनिंग साहित्याच्या संचांची संख्या मर्यादित असून, प्रथम नोंदणी करणाऱ्या ५० महिला भगिनींनाच या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक महिलांनी ७९७२६८२९९४ या क्रमांकावर तातडीने नोंदणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे यांनी केले आहे.

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित हा उपक्रम महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पनांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, जिल्ह्यातील महिला शेतकरी भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular