VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/ देसाईगंज, ०९ ऑगस्ट २०२६::- जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवार, ९ ऑगस्ट रोजी देसाईगंज येथील क्रांती बिरसा मुंडा चौकाला भेट देऊन आद्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करण्यात आला.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या स्वाभिमान, हक्क आणि अस्तित्वासाठी दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजातील शिक्षण, संस्कृती, परंपरा, हक्क-अधिकार तसेच सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक श्यामभाऊ उईके, उमेश उईके, युवक काँग्रेस आरमोरी विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, ऋषिकेश रामदास मसराम, टीकाराम आत्राम, उमेश खुशाल कोडापे, साजन मेश्राम, रमाकांत सूर्यवंशी, अक्षय शेडमाके, दामोदर जुमनाके यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करत उपस्थितांनी “जय बिरसा! जय आदिवासी!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
