VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/आरमोरी,०९ ऑगस्ट २०२६::- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरमोरी शहरात रविवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आदिवासी समाजाच्या एकतेचा, अस्मितेचा आणि हक्कांचा प्रभावी संदेश दिला.

रॅलीदरम्यान आदिवासी समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरण तसेच घोषणांनी आरमोरी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव रॅलीत सहभागी झाले होते.

यावेळी आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि अस्तित्व जपण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आदिवासी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

आमदार रामदासजी मसराम यांच्या सहभागामुळे रॅलीला विशेष उत्साह प्राप्त झाला. ‘एकता, संस्कृती आणि अस्मिता’ या भावनेने निघालेल्या या रॅलीने आरमोरीत आदिवासी एकतेचा प्रभावी संदेश दिला.
