VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/एटापल्ली,१२ ऑगस्ट २०२६::-‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने तोडसा ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे, गावातील एकल महिला ग.भा. पिल्लीबाई गावडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
या उपक्रमातून महिला सन्मान, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीची भावना व्यक्त केली.

यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच कु. वनिता कोरामी, उपसरपंच श्री. प्रशांत आत्राम, ग्रामविकास अधिकारी श्री. रमेश बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य श्री. रैजु गावडे, श्री. विधान मंडल, श्री. दिनेश तिम्मा, श्री. नामदेव दुर्गे, श्री. नानेश गावडे, श्री. सदु दुर्वा, श्री. दीपक पांडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व उपस्थित नागरिक सहभागी झाले होते.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात राष्ट्रध्वज फडकवून देशप्रेम, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
