Saturday, September 5, 2026
HomeDhanoraसर्पदंशाने मृत अनु गाजुरं कोरेटीच्या कुटुंबाला तात्काळ एक लाखांची मदत...

सर्पदंशाने मृत अनु गाजुरं कोरेटीच्या कुटुंबाला तात्काळ एक लाखांची मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /धानोरा,११ ऑगस्ट २०२६::- धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कु. अनु गाजुरं कोरेटी हिच्या कुटुंबीयांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने तात्काळ एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी यांनी अनुच्या वडिलांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द केला. या दुःखद प्रसंगी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले तसेच प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्रमशाळांमध्ये आवश्यक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणीही पुढे येत आहे.

या मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाला काहीसा आधार मिळाला असून, प्रशासनाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular