Sunday, September 6, 2026
HomeChamorshiशिवाजी विद्यालयात लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ गठित...

शिवाजी विद्यालयात लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ गठित…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,१३ ऑगस्ट २०२६::- स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची जाणीव निर्माण व्हावी, लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी तसेच विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्वाची संकल्पना प्रत्यक्ष अनुभवता यावी, या उद्देशाने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रियेद्वारे घेण्यात आली.

या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये शालेय मुख्यमंत्रीपदी चैताली भास्कर काकडे, तर उपमुख्यमंत्रीपदी अमानात अली गुलाब अली सय्यद व कुमारी अनुष्का दिनेश खेवले यांची निवड करण्यात आली.

तसेच शिक्षण मंत्री – विकी महेश कुनघाडकर, क्रीडामंत्री – कुणाल संतोष सोनटक्के, आरोग्य व स्वच्छता मंत्री – पिंटू पुरुषोत्तम सुरजागडे, सहल मंत्री – देव मंगेश बोधलकर, पोषण आहार मंत्री – यावेद अरविंद पिपरे, सांस्कृतिक मंत्री – कुमारी अनुष्का प्रशांत शेंडे, महिला व बालकल्याण मंत्री – कुमारी धनश्री सतीश पतंगे आणि शालेय शिस्त मंत्री – इशिका किरण वासेकर यांची निवड झाली.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, शिस्तबद्ध व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक वैभव चिलमवार, सागरमल आडे, राकेश खेवले व पंकज भिसे यांनी विशेष सहकार्य केले.

नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे प्राचार्य धनेंद्र चौधरी व उपप्राचार्य शाम भर्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदान, नेतृत्व, जबाबदारी, निर्णयप्रक्रिया आणि लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शालेय स्तरावरच लोकशाहीची बीजे रुजविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular