VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /अहेरी,१३ ऑगस्ट २०२६::- छल्लेवाडा येथील पवन शंकर नागोसे यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारासाठी त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. मात्र, गडचिरोलीकडे नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागोसे यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मृतदेह स्वगावी नेण्यासाठी वाहनाची अडचण निर्माण झाली.
यावेळी छल्लेवाडा येथील काँग्रेस कार्यकर्ते हणमंतू ठाकरे यांनी घटनेची माहिती काँग्रेस नेते डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांना दूरध्वनीवरून दिली. कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. कंकडालवार यांनी कोणताही विलंब न करता स्वखर्चाने खासगी वाहनाची व्यवस्था करून नागोसे यांचे पार्थिव स्वगावी पोहोचविण्यासाठी मदतीचा हात दिला.
या मदतीमुळे दुःखाच्या प्रसंगी नागोसे कुटुंबाला मोठा आधार मिळाला. कुटुंबीयांनी डॉ. कंकडालवार यांचे आभार मानले असून, त्यांच्या या संवेदनशील आणि माणुसकीच्या भूमिकेची छल्लेवाडा परिसरात सकारात्मक चर्चा होत आहे.
दुःखाच्या प्रसंगी राजकारणापलीकडे जाऊन मदतीला धावून जाण्याची भूमिका हीच खरी माणुसकी असल्याची भावना यावेळी परिसरातून व्यक्त होत आहे.
