Saturday, September 5, 2026
HomeChamorshiईदच्या पार्श्वभूमीवर चामोर्शीत पोलिसांचा कडक बंदोबस्त; रूट मार्चद्वारे शांततेचा संदेश...

ईदच्या पार्श्वभूमीवर चामोर्शीत पोलिसांचा कडक बंदोबस्त; रूट मार्चद्वारे शांततेचा संदेश…

VAINGANG NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,२५ ऑगस्ट २०२६::- ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सण उत्साहात व शांततेच्या वातावरणात पार पडावा, यासाठी चामोर्शी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्ग व संवेदनशील भागांतून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.

चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील विविध भागांतून संचलन करत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश दिला.

ईद सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अफवा, चुकीची अथवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांवरही पोलिस प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे आणि ईद सण सामाजिक सलोखा, शांतता व बंधुभावाच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी पोलिसांनी घेतलेल्या या खबरदारीमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular