VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
वैरागड येथील श्रद्धास्थानाचे नुकसान; वन विभागाला पंचनामा करून तातडीने कार्यवाहीच्या सूचना,
गडचिरोली/आरमोरी,२८ ऑगस्ट २०२६::- आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाच पांडव देवस्थानाचे रानटी हत्तींकडून नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली.

यावेळी आमदार मसराम यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच देवस्थानाच्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
देवस्थानाचे नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना, आमदार मसराम यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. देवस्थानाच्या नुकसानीबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, सरपंच संगीता पेंदाम, माजी उपसभापती विनोद बावनकर, ग्रामपंचायत सदस्या संगीता मेश्राम, मनिषा खरवडे, ग्रामसेवक गाटपायले, सागर वाढई, वनरक्षक बिश्वास, वनपाल गजबे, वनरक्षक धात्रक, नेताजी नेवारे, अजय नवहाते, प्रमोद तावेडे, सुभाष हर्षे, दिनकर लोथे, अविनाश खरवडे, चंदू लांजीकार, आदेश आकरे, रवी नेवरे, मिथुन बनकर, रवी दूमाने, खुशाल नेवारे, जगदीश पेंदराम, मयुर ढेंगरे, राजू पत्रिकर आणि विशाल बनकर आदी उपस्थित होते.

