Saturday, September 5, 2026
HomeChamorshiचामोर्शीत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे जल्लोषात चामोर्शी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून स्वागत...

चामोर्शीत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे जल्लोषात चामोर्शी भाजपा पदाधिकाऱ्यांकडून स्वागत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा,

गडचिरोली /चामोर्शी,२७ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी नगरीत प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे स्वागत केले.

भाजप तालुकाध्यक्षा रोशनीताई स्वप्निल वरघंटे यांच्या नेतृत्वाखाली हे स्वागत करण्यात आले. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व्यस्त दौऱ्यावर असतानाही त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत आपला ताफा थांबविला. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला तसेच आस्थेने विचारपूस केली. मंत्र्यांनी दाखविलेल्या या आपुलकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा :-

गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण व्हावे, तसेच चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा, अशी अपेक्षा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध विकासकामांना गती मिळून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे, भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजप ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, श्रावण पाटील सोनटक्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कविताताई किरमे, तालुका महामंत्री वासुदेव चिचघरे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजमवार, माजी शहराध्यक्ष सोपान नैताम, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यश गण्यारपवार, ज्येष्ठ नेते रमेश नैताम, रामचंद्र वरवाडे, पंकज पेशटीवार, विनोद किरमे, मनिषा बोधनवार यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular