Saturday, September 5, 2026
HomeAramoriहक्कांसाठी महामोर्चाची हाक; आ. रामदास मसराम यांचे एकजुटीचे आवाहन...

हक्कांसाठी महामोर्चाची हाक; आ. रामदास मसराम यांचे एकजुटीचे आवाहन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/आरमोरी २८ ऑगस्ट २०२६::- आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार आणि महागाईने त्रस्त नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी ३१ ऑगस्टला भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी कुरखेडा येथील विश्रामगृहात आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रश्न आणि नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांना शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, निराधार नागरिकांसह महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार रामदासजी मसराम यांनी केले.

३१ ऑगस्टला महामोर्चा :-

आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १२ वाजता महामोर्चाला सुरुवात होणार आहे. आमदार रामदास मसराम यांच्या कार्यालयापासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, वडसा असा महामोर्चाचा मार्ग राहणार आहे.

या महामोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यात येणार असून, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने महामोर्चात सहभागी होऊया!” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular