Saturday, September 5, 2026
HomeEtapalliपैडीत भाकपाची ताकद वाढली...

पैडीत भाकपाची ताकद वाढली…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

उपसरपंच, गाव पाटील, ग्रामसभा अध्यक्ष-सचिवांसह नागरिकांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश,

गडचिरोली /एटापल्ली,२९ ऑगस्ट २०२६::- कोटमी ग्रामपंचायत अंतर्गत पैडी गावात भारतीय कम्युनिस्ट पक्षाला संघटनात्मक बळ मिळाले असून, कोटमी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महादेव पदा, गाव पाटील बारसु वडडे, ग्रामसभा अध्यक्ष सोनू नरोटे, ग्रामसभा सचिव दिनेश वडडे यांच्यासह दिपक पदा, संतोष मडावी, नितीन होळी, लालसू वडडे, मालू मटामी तसेच पैडी गावातील अनेक नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी कॉ. सुरज जक्कुलवार, जिल्हा सदस्य आणि कॉ. तेजस गव्हरे उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर पैडी गावातील नागरिकांची गोटूलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच अन्य मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जल-जंगल-जमिनीच्या हक्कांसाठी संघर्षाचा निर्धार :-

आदिवासी तसेच इतर पारंपरिक वननिवासींवर झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी त्यांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या हक्कांसाठी जनसहभाग वाढवून शासन व प्रशासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गरज भासल्यास जनआंदोलन उभारण्याची भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.

कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “जनतेच्या प्रश्नांसाठी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर वर्षभर जनतेसोबत राहून संघर्ष करणे ही भाकपाची भूमिका आहे. जल, जंगल, जमीन, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी जनतेला संघटित करून लढा उभारला जाईल. निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊन मत मागू आणि त्यांच्या अपेक्षेनुसार विकासकामे करून देऊ. जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष जारी रहेगा.”

पैडी गावातील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून केलेला सामूहिक पक्षप्रवेश हा परिसरातील जनतेच्या प्रश्नांवरील संघर्षाला अधिक बळ देणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोटमी ग्रामपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या सहभागातून संघटित संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular