VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
मुख्याधिकाऱ्यांसह विविध समस्या जाणून घेतल्या; प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला सूचना,
गडचिरोली /देसाईगंज, दि. ४ सप्टेंबर २०२६ : जुनीवडसा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची आमदार रामदासजी मसराम यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरपरिषद देसाईगंजचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्यासह त्यांनी परिसरातील विविध समस्या जाणून घेत त्यावर आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.

पाहणीदरम्यान नागरिकांनी परिसरातील विविध अडचणी आमदार मसराम यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्यानंतर संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार मसराम यांनी मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना दिल्या.
स्थानिक पातळीवरील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे आणि प्रलंबित समस्या वेळेत मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. आमदारांनी प्रत्यक्ष परिसरात येऊन समस्या जाणून घेतल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी नगरसेवक तथा गटनेते विकास प्रधान, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष श्याम उईके, कमलेश बारस्कर, सागर वाढई, योगेश नेवारे, दिलीप उके, दिवाकर भुते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
