VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
देसाईगंज | दि. ५ सप्टेंबर २०२६ : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नगरसेविका मंदाताई प्रकाश समर्थ यांच्या निवासस्थानी कन्हैयाच्या पूजन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भक्तिमय सोहळ्यास आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून कन्हैयाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी आमदार रामदास मसराम यांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना केली. पूजनाच्या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. श्रीकृष्णाच्या जयघोषाने आणि भक्तांच्या उत्साहाने सोहळ्याला विशेष रंगत आली.

कार्यक्रमादरम्यान आमदार मसराम यांनी उपस्थित नागरिक, महिला, कार्यकर्ते व भक्तगणांशी आपुलकीने संवाद साधला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, बंधुभाव, सत्य, कर्तव्य आणि धर्माच्या संदेशाचे महत्त्व अधोरेखित केले.

नगरसेविका मंदाताई प्रकाश समर्थ यांच्या निवासस्थानी आयोजित या पूजन व दर्शन सोहळ्याला परिसरातील नागरिक व भक्तगणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात हा सोहळा उत्साहात पार पडला.
