Saturday, September 5, 2026
HomeChamorshiचामोर्शीत कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करा; नागरिकांची मागणी...

चामोर्शीत कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करा; नागरिकांची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

प्रभारी तलाठ्यावर कामकाजाचा भार; महसूलविषयक सेवांना विलंब होण्याची शक्यता,

गडचिरोली /चामोर्शी, 04 सप्टेंबर 2026::-चामोर्शी येथे अनेक दिवसांपासून तलाठ्याचे पद रिक्त असल्याने महसूल विभागाचे कामकाज सध्या प्रभारी तलाठ्यामार्फत सुरू आहे. प्रभारी तलाठी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत असले तरी नागरिकांच्या वाढत्या कामाचा विचार करता या महत्त्वाच्या पदावर कायमस्वरूपी तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

चामोर्शी परिसरातील नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार नोंदणी, जमीनविषयक कागदपत्रे, पीक पाहणी, विविध प्रमाणपत्रे तसेच अन्य महसूलविषयक कामांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे रिक्त पदामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी नियमित तलाठ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्या प्रभारी तलाठ्यामार्फत कामकाज सुरू असून, नागरिकांच्या विविध मागण्या व महसूलविषयक कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ही व्यवस्था तात्पुरती असल्याने भविष्यातील कामकाजाचा विचार करून रिक्त पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

महसूल विभागाशी संबंधित कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी चामोर्शी येथे नियमित तलाठ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular