Friday, September 11, 2026
HomeChamorshiवाघोली शिवारातील खुनाचा उलगडा लवकरच? मृताची ओळख पटली; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके...

वाघोली शिवारातील खुनाचा उलगडा लवकरच? मृताची ओळख पटली; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, 08 सप्टेंबर 2026::-चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा वाघोली शिवारात ७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या खुनाच्या घटनेतील मृताची अखेर ओळख पटली आहे. मृताचे नाव नंदकिशोर मोतीलाल मिश्रा उर्फ बंटी (वय ३४), रा. तेली मोहल्ला, वॉर्ड क्र. ५, श्रीराम मंदिराजवळ, मुल, ता. मुल, जि. चंद्रपूर असे निष्पन्न झाले आहे.

वाघोली शिवारात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर एका इसमाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता उघडकीस आली होती. घटनेनंतर पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला होता.

दरम्यान, मंगळवारी मृताचे नातेवाईक चामोर्शी येथे दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविल्याने तपासाला आता महत्त्वाची दिशा मिळाली आहे. मात्र, नंदकिशोर मिश्रा यांचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

खुनाचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मृताच्या नातेवाईकांसह काही संशयितांचीही चौकशी केली जात असून, घटनेमागील कारण आणि आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीचा लवकरच शोध लागण्याची शक्यता पोलिसांच्या तपासाच्या गतीमुळे निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular