Monday, October 26, 2026
HomeAramoriरानटी हत्तींचा पिंपळगावात हैदोस! भातपिकासह सोलर पंपाचीही नासधूस...

रानटी हत्तींचा पिंपळगावात हैदोस! भातपिकासह सोलर पंपाचीही नासधूस…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

हातातोंडाशी आलेला घास हिरावला; आमदार रामदास मसराम यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी,

देसाईगंज, २५ ऑक्टोबर २०२६::- देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव परिसरात रानटी हत्तीने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून शेतात ठेवलेल्या भाताच्या पिकाची आणि धानाच्या पूंजण्यांची हत्तींनी नासधूस केली. याशिवाय शेतातील सोलर पंपाचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच शेतीच्या खर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना ऐन हंगामात या घटनेचा मोठा फटका बसला आहे.

या घटनेची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी पिंपळगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी रानटी हत्तींच्या हल्ल्यामुळे भातपिकाचे, कापणी केलेल्या धानाच्या पूंजण्यांचे तसेच सोलर पंपाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

आमदार मसराम यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य नोंद घेऊन शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा या पाहणीदरम्यान व्यक्त करण्यात आली.

वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी चिंतेत :-

देसाईगंज तालुक्यात रानटी हत्तींच्या हालचालींमुळे शेतीचे नुकसान होण्याच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील उभ्या पिकांसह कापणी केलेल्या धानाचेही नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, वनविभागाने नुकसानग्रस्त भागात लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाहणीवेळी उपस्थित :-

यावेळी देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कमलेश बारस्कर, गजेंद्र नाईक, पुरुषोत्तम देशकर सर, वसंत बगमारे, रितेश गाडगे, रोशन मेश्राम, वनरक्षक धात्रक, वनरक्षक राऊत, संजू घरत, टीकाराम धोटे, देवानंद भोयर, सदानंद दोनाडकर, संदीप धोटे, सुरेश बुल्ले, बीसन घरत, राजेंद्र राऊत, ईश्वर नाईक, काशिनाथ धोटे, भरत भोयर, जितेंद्र भोयर, सुरज पारधी, लीला साई प्रधान, त्रेंसख मेश्राम, कृष्णाजी भोयर, दिनेश्वर प्रधान, हेमराज नाकतोडे, शकुंतला ताई लेंडे, पुंडलिक राऊत, शामराव भोयर, श्रावण पत्रे, मुरलीधर प्रधान, सुनीताताराम, सुगंधा प्रधान, अरुणाताई प्रधान, मेघश्याम दोनडकर, उर्मिलाताई सहारे, सुमिता भोईर, अश्विनी भोईर, मनोर प्रधान, जगदीश जराते आणि माधव भोयर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular