Thursday, September 17, 2026
HomeChamorshiमार्कंडा देवाच्या पवित्र भूमीत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित...

मार्कंडा देवाच्या पवित्र भूमीत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आ. डॉ. मिलिंद नरोटे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ,

गडचिरोली /चामोर्शी, 17 सप्टेंबर 2026::-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ गडचिरोली जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडा देव मंदिर परिसरात विधिवत पूजा-अर्चना व जलाभिषेक करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा विशेष उपक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.

आ. डॉ. मिलिंद नरोटे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वात, तसेच भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘आशीर्वादाचा दिवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मार्कंडा देवाच्या पवित्र परिसरात दिवे प्रज्वलित करत सेवा, सामाजिक सहभाग आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ गडचिरोली जिल्ह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानात ‘आशीर्वादाचा दिवा’, पवित्र जल संकलन तसेच वडनगर ते वाराणसी यात्रा यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.

समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन सेवा आणि सामाजिक सहभागाची भावना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध उपक्रमांद्वारे जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

मार्कंडा देवाच्या पवित्र परिसरात प्रज्वलित करण्यात आलेल्या ‘आशीर्वादाचा दिवा’ कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular