Friday, September 18, 2026
HomeChamorshiचामोर्शीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची गणेश मंडळांना सदिच्छा भेट; बाप्पाचे घेतले...

चामोर्शीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची गणेश मंडळांना सदिच्छा भेट; बाप्पाचे घेतले दर्शन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाजपा तालुकाध्यक्ष रोशनीताई वरघंटे यांच्या निवासस्थानी तसेच युवा गणेश व छत्रपती गणेश मंडळात गणरायाचे पूजन; गणेशभक्तांना दिल्या शुभेच्छा,

गडचिरोली/चामोर्शी, 18 सप्टेंबर 2026::- गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे यांनी चामोर्शी शहरासह भेंडाळा येथील गणेश मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रोशनीताई वरघंटे यांच्या निवासस्थानी तसेच शहरातील बाजार रोडवरील युवा गणेश मंडळ आणि भेंडाळा येथील छत्रपती गणेश मंडळाला भेट देण्यात आली.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वरघंटे कुटुंबीयांशी तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

या सदिच्छा भेटीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, भक्तीभाव आणि बंधुभाव वृद्धिंगत करणारा उत्सव असून, या उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

गणरायाच्या दर्शनाने आणि स्नेहसंवादाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular