Tuesday, September 22, 2026
HomeGadchiroliसेवा संकल्प अभियानांतर्गत १७ विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप...

सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना लाभ,

गडचिरोली, 22 सप्टेंबर 2026::- ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या दृष्टी आरोग्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गडचिरोली तालुक्यातील १७ शालेय बालक व विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शाळांमध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीदरम्यान दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. संबंधित विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) येथे संदर्भित करण्यात आले. तेथे आवश्यक तपासणी व निदान निश्चितीनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.

शालेय वयात दृष्टीदोषाचे वेळेत निदान होणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तसेच शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शालेय स्तरावर आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील निदान व उपचारासाठी संदर्भित करण्यात येते. याच प्रक्रियेअंतर्गत दृष्टीदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमातून चष्मे उपलब्ध करून देण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली; अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रतिनिधी, DEIC-RBSK चे अधिकारी व कर्मचारी, महात्मे आय हॉस्पिटल, नागपूरची चमू तसेच संबंधित विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आवश्यक दृष्टीसाधने मोफत उपलब्ध करून देत त्यांच्या आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular