VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,
श्री गणरायाची विधीवत पूजा करून गणेशभक्तांना सुख-समृद्धीच्या शुभेच्छा,
गडचिरोली, 22 सप्टेंबर 2026::- गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात गडचिरोली शहरातील चनकाईनगर येथील एकता गणेश मंडळाला गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांनी सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे विधीवत पूजन करून सर्व गणेशभक्तांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी श्रीचरणी प्रार्थना केली.
गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील गणेशभक्त तसेच महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर यांच्या भेटीमुळे मंडळातील कार्यकर्ते व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी गडचिरोली नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष निखिलजी चरडे, नगरसेवक अंकुशभाऊ नैताम तसेच श्री. सुरेशभाऊ भांडेकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
दरम्यान, एकता गणेश मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यगणांच्या वतीने नगराध्यक्षा सौ. प्रणोतीताई सागर निंबोरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपनगराध्यक्ष निखिलजी चरडे आणि सुरेशभाऊ भांडेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा, भक्तिभाव आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या भेटीदरम्यान नगराध्यक्षा व उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी चनकाईनगर परिसरातील गणेशभक्त, महिला भगिनी, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
