VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी, 26 सप्टेंबर 2026::-कुनघाडा (रै.) बाजारपेठ येथील सत्यमेव जयते गणेश मंडळाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट देत विसर्जन मिरवणुकीपूर्वी आयोजित आरतीमध्ये सहभागी होऊन श्री गणरायाची विधिवत आरती केली. यावेळी त्यांनी गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आरतीच्या वेळी गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
यावेळी गणेशमूर्ती साकारून भक्तिमय वातावरण निर्माण करणाऱ्या मूर्तिकारांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. गणेशमूर्तीच्या माध्यमातून भक्ती, कला आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या मूर्तिकारांच्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचे कार्य करणाऱ्या सत्यमेव जयते गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शुभेच्छा दिल्या. उत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, ज्येष्ठ नेते आनंदजी भांडेकर, मोहनजी चिडंगे, गुरुदेवजी गेडाम, गोपालजी गव्हारे, हर्षदजी भांडेकर यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त उपस्थित होते.
