VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन; हृदयरोगासह विविध आजारांवर वैद्यकीय मार्गदर्शन,
गडचिरोली /चामोर्शी,२६ सप्टेंबर 2026::- संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन (दिल्ली), ब्रांच चामोर्शीच्या वतीने ‘Service with Humility’ या सेवाभावी संकल्पनेतून चामोर्शी येथे हृदयरोग व सर्वसाधारण आजारांसाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. संत निरंकारी सत्संग भवन (जुनी डिजनीलँड शाळा) येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला चामोर्शी शहरासह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच विविध आजार, आरोग्यविषयक तक्रारी आणि पुढील उपचारांबाबत आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले.
या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम अरोरा तसेच ICU Specialist Physician व Pulmonologist डॉ. जितेंद्र जेसवानी यांनी रुग्णांची तपासणी केली. हृदयविकार, श्वसनविकार तसेच अन्य सर्वसाधारण आजारांबाबत नागरिकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्याने शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला.
सेवा हीच साधना’ या भावनेतून आरोग्यसेवा :-
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याच सामाजिक बांधिलकीतून चामोर्शीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे ग्रामीण व परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध झाले.
उद्घाटनप्रसंगी झोनल प्रमुख किसन नागदेवे, चामोर्शी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, अरोरा महाराज, प.आ. डोसवानी, वेदवी मडावी, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, साईनाथ बुरांडे, खुशाल झोडगे, बोरकर महाराज, गिरीधर कन्नाके, नामदेव गव्हार, कान्हूजी गव्हारे यांच्यासह संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सेवेकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि उपचारविषयक सल्ला मिळाल्याने नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
