Friday, October 2, 2026
HomeGadchiroliगांधी-शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन; सत्य-अहिंसेच्या विचारांचा जागर...

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन; सत्य-अहिंसेच्या विचारांचा जागर…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 02 ऑक्टोबर 2026::-राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोलीच्या वतीने चामोर्शी रोड येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महात्मा गांधी यांनी देशाला सत्य, अहिंसा, शांतता आणि स्वच्छतेचा मार्ग दाखविला, तर लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा प्रेरणादायी संदेश देत देशाच्या विकासात जवान आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या दोन्ही महान नेत्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे स्मरण केले. सत्य, अहिंसा, सामाजिक एकोपा, स्वच्छता आणि देशसेवेच्या मूल्यांना आपल्या आचरणात आणण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक तथा गटनेते सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सरचिटणीस माधुरी मडावी, ज्येष्ठ नेते शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, महादेव पाटील भोयर, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई पंजेवाणी, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, हेमंत मोहितकर, नरेंद्र डोंगरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, जितू पाटील मुनघाटे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, रिता गोवर्धन, शितल ठवरे, मीनल चिमूरकर, दिनेश सिडाम, विजय राऊत, स्वप्निल बेहेरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular