Wednesday, October 7, 2026
HomeChamorshiपैसे भरूनही रेती नाही; वाघोली डेपोचा कारभार चर्चेत...

पैसे भरूनही रेती नाही; वाघोली डेपोचा कारभार चर्चेत…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

घरबांधकामे रखडली; तहसीलदारांचे तातडीने रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश,

गडचिरोली /चामोर्शी,07 ओक्टोबर 2026::-चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती डेपोमधून शासनाकडे पैसे भरून रेती बुकिंग केलेल्या नागरिकांना अद्याप रेती उपलब्ध न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गरीब व गरजू नागरिकांची घरबांधकामे रखडली असून, रेती वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी शिवसेना चामोर्शी शहरप्रमुख राजू धोडरे यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन बुकिंग केलेल्या नागरिकांना तातडीने रेती देण्याची मागणी केली. १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशांचाही त्यांनी संदर्भ दिला.

चामोर्शी, घोट व आष्टी परिसरातील नागरिकांनी घरबांधकामासाठी रेती बुकिंग केली आहे. मात्र, रेती उपलब्ध न झाल्याने अनेकांची कामे अर्धवट राहिली आहेत. याची दखल घेत तहसीलदारांनी संबंधितांना बुकिंग केलेल्या पात्र नागरिकांना तातडीने रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

रेती उपलब्ध न केल्यास संबंधित तक्रारींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडे सादर करण्यात येईल, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे. पैसे भरूनही रेती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, प्रशासनाने तातडीने समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular