Friday, October 9, 2026
HomeAheriपदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकर कोहळे यांची अहेरीत बाबा आत्राम यांच्याशी भेट...

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुधाकर कोहळे यांची अहेरीत बाबा आत्राम यांच्याशी भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा; भाजपाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित,

अहेरी, 09 ऑक्टोबर 2026::-पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांनी ८ ऑक्टोबर रोजी अहेरी दौऱ्यादरम्यान आमदार तथा माजी मंत्री बाबा धर्मराव आत्राम यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

या भेटीदरम्यान आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, ज्येष्ठ नेते रविंद्र ओल्लालवार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे अहेरीतील राजकीय वर्तुळात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular