VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चंद्रपूर ,०७ फेब्रुवारी २०२६::- राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन येथे पार पडली.
या बैठकीस गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती दर्शवून लोकसभा क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत मुद्दे मांडले. तसेच जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे केली.

बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत सन 2026–27 या आर्थिक वर्षासाठीच्या प्रारूप विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), किशोर जोरगेवार (चंद्रपूर), देवराव भोंगळे (राजुरा), करण देवतळे (वरोरा), जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक एम. एन. रामानुजन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त नरेश अकुनूरी, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतूरे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
