Friday, October 9, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत ‘वेदा फॅशन व लाइफस्टाइल’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त सुरुवात...

गडचिरोलीत ‘वेदा फॅशन व लाइफस्टाइल’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त सुरुवात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

योगिताताई पिपरे यांच्या हस्ते उद्घाटन; सणासुदीच्या खरेदीसाठी विविध आकर्षक वस्तूंची रेलचेल,

गडचिरोली, 09 ऑक्टोबर 2026::-शहरातील हॉटेल लँडमार्क येथे आयोजित ‘वेदा फॅशन व लाइफस्टाइल’ प्रदर्शनाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सौ. योगिताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन ८ व ९ ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात फॅशन आणि लाइफस्टाइलशी संबंधित विविध आकर्षक वस्तू खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. एकाच छताखाली विविध वस्तूंची खरेदी करता यावी, या उद्देशाने ‘Shop : Explore : Celebrate’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

या प्रदर्शनामुळे गडचिरोलीतील ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कु. वैष्णवीताई दखणे, सौ. रजनीताई जंगमवार, सौ. रोशनीताई बानणारे आणि कु. दर्शिता पिपरे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular