VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
निराधारकांच्या पाठीशी सदैव प्रमोद भगत.
चामोर्शी, ०८ ऑक्टोंबर २०२३ ::- संजय गांधी निराधार,श्रावणबाळ,वृद्ध पेन्शन,योजनेचे तालुक्यात अंदाजे २९ हजाराच्या आसपास लाभार्थी आहेत,४ महिन्या पासून मानधन मिळाले नाही. त्या मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांचे मानधन त्वरित देण्याची मागणी तालुका काँगेस अध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले आहे.
कित्येक दीव्यांग लाभार्थी व वृद्ध लाभार्थी फक्त या योजनेच्या भरोष्यावर आपला उदरनिर्वाह करीत असतात.केंद्र सरकारने तर या योजनेचे पैसे स्वच्छ भारत मिशनच्या जाहिरातीमध्ये खर्च केल्याचे कॅग ने ठपका ठेवला आहे. मोदी सरकार व राज्यसरकार जाहिराती बाजी व शासन आपल्या दारी चा प्रचार करण्यात व्यस्त आहे.
हे लाभार्थी मात्र उपाशी राहून दिवस काळात आहेत.सरकारी दवाखान्यात औशधी अभावी लोक मरत असताना सरकार मात्र शेतकरी ,बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावणारे निर्णय घेण्याची भूमिका घेत आहे.
शासनाने लाभार्थ्यांना त्वरीत मानधन द्यावे, अन्यथा चामोर्शी तहसीलवर मोर्चा काढन्यात येईल असा इशारा तालुका काँगेस अध्यक्ष प्रमोद भगत यांनी दिला आहे.
