Friday, June 5, 2026
HomeKunaghadaवन्यजीव सप्ताह निमित्त कुनघाडा रै वनपरीक्षेत्रात विविध उपक्रम...

वन्यजीव सप्ताह निमित्त कुनघाडा रै वनपरीक्षेत्रात विविध उपक्रम…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

कुनघाडा,१० ऑक्टोंबर २०२३ ::- वनविभाग गडचिरोली, वनपरिक्षेत्र कुनघाडा रै च्या वतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह निमित्त चार उपक्षेत्रात विविध उपक्रमाच्या माध्यमातून श्रमदानातून वनराई बंधारा, स्वच्छता अभियान व वन्यजीव जनजागृती करण्यात आली. 

     उपक्षेत्र कुनघाडा रै येथे स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच जिल्हा परिषद केंद्र व कन्या शाळा कुनघाडा रै येथे आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपक्षेत्र पश्चिम पावीमुरांडा मधील मुतनूर देवस्थान पर्यटन स्थळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन, प्राथमिक आरोग्य पथक पावीमुरांडा येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. उपक्षेत्र पूर्व पावीमुरांडा मधील काळशी ते देवापुर नाल्यावर वनकर्मचारी व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. उपक्षेत्र कुनघाडा रै मधील दर्शनी चक येथे गिधाड व इतर पशु पक्षी याबाबत जनजागृती करण्यात आली. उपक्षेत्र जोगना येथे वनधिकारी , वनकर्मचारी , वनमजुर व शालेय विद्यार्थी यांच्या समवेत पक्षी निरीक्षण करण्यात आले, कुनघाडा रै वानपरिक्षेत्रात वनपरिक्षेत्राधिकारी एम ए तावाडे यांनी बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीच्या माध्यमातून वृक्षतोड थांबवून वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करून पर्यावरण अबाधित राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली. 

         उपक्रम यशस्वी करण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी कु एम ए तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एच जी झोडगे, क्षेत्र सहाय्यक आर पी धाईत, क्षेत्र सहाय्यक एस एस खोब्रागडे, क्षेत्र सहाय्यक एस पी करोडकर, वनरक्षक ए एम टेकाम, वनरक्षक देवेंद्र वासेकर, वनरक्षक एन बी गोटा, वनरक्षक पी एल कोराम, वनरक्षक पी एस कोवासे, वनरक्षक डी जे ढोलने, वनरक्षक कौशल्या मडावी, वनरक्षक वर्षा मडावी, वनरक्षक कु ममता देवाडे, वनरक्षक होमीता मडामे, वनरक्षक वनिता मडावी, वनरक्षक राहुल चीचघरे, वनरक्षक सुनील खोब्रागडे तसेच वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी व वनमजुरांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular