VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली, १४ ऑक्टोंबर २०२३ ::- गडचिरोली येथील पत्रकार फुलचंद देवाजी वाघाडे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या गडचिरोली जिल्हा शहर अध्यक्षपदी आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चामोर्शी तालुका अध्यक्षपदी श्रावण जगन्नाथ वाकोडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी नुकतेच फुलचंद वाघाडे व श्रावण वाकोडे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
गोरगरीब व शेतमजुरांच्या हक्कासाठी सदैव तप्तर राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत असून ,त्यांनी आतापर्यंत अनेक शेतमजूर , व गोरगरिबांना न्याय मिळवून दिलेला आहे.
त्यामुळे सामाजिक, राजकीय ,तसेच पत्रकारिता क्षेत्रातील आणि त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
नियुक्तीला उत्तर देताना युवा पत्रकार फुलचंद वाघाडे आणि श्रावण वाकोडे यांनी म्हटले आहे की , युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी माझ्यावर जिल्हा शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. त्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनता त्याचप्रमाणे अन्यायग्रस्त व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तप्तर राहील. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, दैनिक पुणे वैभव चे संपादक प्रा. किरण जाधव , जगताप सर , महेंद्र माने , गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले , तालुका अध्यक्ष जावेद अली , सचिव नीलिमा बंडमवार , भास्कर फरकडे , किशोर उसेंडी , प्रवीण चन्नावार , उमेश पेंड्याला , रमेश बामनकर , सुरेश मोटकरवार , मारुती कांबळे , आणि सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांना आपल्या नियुक्तीचे श्रेय दिले असून पत्रकार संघटनेकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
