Sunday, May 24, 2026
HomeChamorshiयुवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चामोर्शी तालुका सचिवपदी उमेश गझलपेल्लीवार...

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चामोर्शी तालुका सचिवपदी उमेश गझलपेल्लीवार…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी

चामोर्शी, २२ ऑक्टोंबर २०२३ ::- युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चामोर्शी तालुका सचिवपदी उमेश गझलपेल्लीवार यांची निवड करण्यात आली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पुढाकार असतो विविध सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर असतात. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सविस्तर आढावा घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी उमेश गझलपेल्लीवार यांना नियुक्तीपत्र सोपविले आहे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यात पत्रकारांचे संघटन तयार करून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कृतिशील लढा उभारणार असल्याची प्रतिक्रिया उमेश गझलपेल्लीवार यांनी व्यक्त केली.

आपल्या निवडीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे चामोर्शी तालुकाध्यक्ष श्रावण वाकोडे, पुंडलिक भांडेकर यांना दिले असून चामोर्शी तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करून त्यांना सर्व पत्रकार बंधुंनी, हितचिंतकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular