Saturday, May 23, 2026
HomeChamorshiसर्प मित्र व वनविभागाने अजगर सापाला दिले जीवनदान...

सर्प मित्र व वनविभागाने अजगर सापाला दिले जीवनदान…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

 चामोर्शी,२५ ऑक्टोंबर २०२३ ::-वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या क्षेत्र साहेब भाडबिडी क्षेत्रात अजगर सापाला दिले जीवदान.सध्या थंडीचे दिवसात साप या सरपटणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे आज २४ आक्तोंबर रोजी नेताजी नगर येथील अरविंद राय यांच्या शेतात १० फूट लांबीचा अजगर साप निघाल्याची माहिती भाडभिडी वनविभागाला मिळताच सर्प मित्र गंगेश अलीवार यांना पाचारण करून भाडभिडी शेत्रसहाय्यक व्हीं. एस चांदेकर, वनरक्षक संतोष इस्टाम, लांजेवार, कोरवते, बंनोत, वैरागडे, कुमरे 

     घटना स्थळी येऊन सापाला पकडण्यात यश मिळवले. 

 त्या अजगराला सर्प मित्र व वनविभागाच्या पथकांनी भाडभिडी च्या क.न.३७५ मधील जंगल 

परिसरातील सोडून जीवनदान दिले. 

  नेताजी नगर येथे नागरिक व मुलांना वण्यजीव बदल सर्पमित्र गंगेश अलीवार यांनी विषारी व बिन विषारी सापाबद्दल माहिती दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular